शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्राह्मीण काईट’ला मुलांच्यामुळे जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:02 IST

कोल्हापूर : शहरातील मराठा हायस्कूलच्या प्रांगणातील एका झाडावर पतंगाच्या मांजा दौºयात पंख अडकून 'ब्राम्हीण काईट' या जातीचा पक्षी जखमी झाला.

ठळक मुद्देचिल्लर पार्टी, अग्निशमन दलाच्या सदस्यांनी उपचारासाठी केली मदत पतंगाच्या मांजा दोºयात पंख अडकून ‘ब्राह्मीण काईट’ या जातीचा पक्षी जखमी

कोल्हापूर : शहरातील मराठा हायस्कूलच्या प्रांगणातील एका झाडावर पतंगाच्या मांजात पंख अडकून 'ब्राम्हीण काईट' या जातीचा पक्षी जखमी झाला. त्याची चार पिसे तुटल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते.क्रिडांगणावर खेळणाºया प्रसाद कांबळे, शिवा खाकी, सुजल कांबळे, साहील शेख, रोहन राठोड या मुलांना दुपारी ही घटना दिसली. त्यांनी चिल्लर पार्टीचे मिलींद पाटील यांना या जखमी पक्ष्याची माहिती दिली. तेव्हा त्यांनीही अग्निशमन दलाच्या पथकाला याची माहिती दिली. उंच झाडावर अडकल्याने व सुटकेसाठी अधिक धडपड केल्याने ब्राम्हिन काईट जखमी झाली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक तत्काळ दाखल झाले. त्यांनी अथक परिश्रमाने 'ब्राम्हिण काईट' ची सुटका करून अधिक उपचारासाठी मंगळवार पेठ येथील पशु चिकित्सालयमध्ये दाखल केले.

यासाठी मुख्याध्यापक प्रवीण काटकर, किरण पाटील यांनी अग्निशमन दलाच्या पथकाला सहकार्य केले.पतंग उडविण्याच्या प्रयत्नात आजही मांज्यात अडकून नाहक छोट्या मोठ्या पक्ष्यांचा जीव धोक्यात येत आहे. पतंग उडविणाºया हौशी कलाकारांनी या खेळात पक्षी जखमी होणार नाहीत याची काळजी घ्यावी, त्यातूनही एकादा पक्षी जखमी झाल्यास तातडीने त्याला उपचारासाठी मदत करणे किंवा पक्षीमित्र यांना कळवून त्याला जीवदान देण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे असे चिल्लर पार्टी संस्थेचे मिलींद पाटील यांनी सांगितले. आज या 'ब्राम्हीण काईट' पक्ष्यालाही केवळ या मुलांमुळेच जीवदान देणे शक्य झाल्याचे पाटील म्हणाले.